आयनल तंटामुक्ती ग्रामसमिती अध्यक्षपदी बापु फाटक

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 13, 2023 10:59 AM
views 118  views

कणकवली : आयनल गावच्या तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच बापु ज्ञानदेव फाटक यांची निवड करण्यात आली. तंटामुक्तीच्या अध्यक्षपदासाठी प्रविण जगन्नाथ साटम व बापू ज्ञानदेव फाटक हे दोन उमेद्वार इच्छुक होते. ग्रामसभेसाठी उपस्थिती असलेल्या ग्रामस्थानी दोन्ही उमेद्वारांमध्ये एकमत होण्यासठी प्रयत्न केले मात्र एकमत नझाल्याने शेवटी हात वर करुन मतदान घेण्यात आले. त्यात बापू ज्ञानदेव फाटक हे विजयी झाले.

ग्रामसभेसाठी माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, सरपंच सिध्दी दहिबावकर, सदस्य -सागर घाडी, मारुती तोरस्कर, संगिता कुबडे, पेडणेकर, फाटक, अनिल ओटवकर, कांता पेडणेकर, भालचंद्र साटम, साईनाथ ओटवकर, उत्तम ओटवकर, संतोष वायंगणकर, अशोक मगम, उपस्थित होते.