सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन टीमला मदत निधी

मंत्री केसरकरांच्या वाढदिवसाचं औचित्य
Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 12:33 PM
views 138  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पदाधिकारी व दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या आपत्कालीन व्यवस्थापन टीमसाठी मदत निधी  देण्यात आला. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा निधी सामाजिक बांधिलकीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.

याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, संजय पेडणेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, दत्ता सावंत, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, प्रेमानंद देसाई, अब्जु सावंत आदी उपस्थित होते.