
वैभववाडी : वायंबोशी येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर समाजभवनाचे उद्या रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११वा.महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकासमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.










