AI वर आधारित कृषि ई- प्रक्षेत्र ग्रंथालय

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये प्रयोग
Edited by: मनोज पवार
Published on: June 28, 2025 12:01 PM
views 91  views

चिपळूण : शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे AI तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि ई - प्रक्षेत्र ग्रंथालय हा महाराष्ट्रामधील प्रथमच साकारण्यात आलेला नाविन्यपूर्ण व संशोधनात्मक प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे.दि.27 जुन रोजी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे उपस्थितीत या ग्रंथालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन पार पडले.

बदलत्या काळात कृषि शिक्षणाला एआय तंत्रज्ञानाची जोड देवुन पिके, शोभिवंत झाडे, फुले, फळे व भाजीपाला यांची विस्तृत माहीती विद्यार्थ्यांच्या पर्यंत मोबाईल च्या एका क्लिक मध्ये उपलब्ध करून देणे व त्यांच्या कृषि विषयी ज्ञानात भर टाकण्याच्या उद्देशातून सलग तीन महिन्याच्या अथक परिश्रमातून प्रा प्रशांत पवार व प्रथम वर्ष विध्यार्थी यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारण्यात आला आहे. महाविद्यालयमधये भेट देणाऱ्या शेतकरी, पर्यटक व कृषि तज्ञ याना या ग्रंथालयाच्या माध्यमातून झाडांची व पिकांची ओळख होणार आहे. पिकांचे शास्त्रीय नाव, त्यावर प्रादुर्भाव करणारे रोग ,कीटक याची माहीती व व्यवस्थापन ई. चा समावेश यामध्ये आले. महाविद्यालयाचा आवारातील सर्व झाडांजवळ हे क्यु आर कोड बसविण्यात आले असुन भविष्यात काळामध्ये महाविद्यालयाच्या 350 एकर प्रक्षेत्रावर हा उपक्रम राबविण्याचा प्रा.प्रशांत पवार व विद्यार्थ्यी महेश कोरे, मांतेश कोरे, कुमारी आदिती पवार, वरद पाटील व कु. अभिजीत झांबरे यांचा मानस आहे. या प्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी प्रा.प्रशांत पवार व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. भविष्यात काळात कृषि क्षेत्राच्या विस्तारिकरणासाठी व येणार्या सर्व संकटांना शास्त्रीय दृष्ट्या तोंड देण्यासाठी एआय तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल तसेच शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये देखील लवकरच एआय तंत्रज्ञान सेंटर सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत व या विषयातील काही शास्त्रीय संस्थांशी  संलग्न होवुन, त्यांच्याशी करार करुन कोकणातील एकमेव संशोधन सेंटर लवकर उभा होईल  तशी चर्चा देशाचे माजी कृषि मंत्री शरदचंद्रजी पवार यांचे सोबत झाली आहे असे मनोगत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला विस्तारित स्वरुप देणयासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील व विभाग प्रमुख डाॅ.हरिश्चंद्र भागडे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विज वितरण विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता श्री.कोंडा व उपव्यस्थापक अधिकारी श्री काजरोळकर हे उपस्थित होते.