
देवगड : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वळीवंडे नं. १ येथे कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. "झाडे लावा, झाडे जगवा" अशा घोषणा देत शालेय विद्यार्थ्यांसह प्रभातफेरी काढण्यात आली.
या कार्यक्रमात शालेय परिसरात विविध फळझाडे व फुलझाडांची लागवड करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मालंडकर मॅडम आणि सहाय्यक शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. मार्गदर्शनासाठी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील प्राचार्य पंकज संते सर, विषयतज्ञ साईराम चव्हाण सर आणि अथर्व बगाडे सर उपस्थित होते. कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाटच्या मार्गदर्शनाखाली वळीवंडे शाळेत कृषी दिन साजरा,कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने वृक्षलागवड उपक्रम यावेळी करण्यात आला.वळीवंडे शाळेत कृषी दिन उत्सव; कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता.फोंडाघाट कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड व जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त यावेळी उस्फुर्त प्रतिसाद लाभला
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची हिरवी मोहिम ठरली यावेळी लक्षवेधी या उपक्रमात कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न) येथील विद्यार्थी अथर्व साळोखे, प्रतीक भोपळे, शुभम पोवार, प्रथमेश पाटील, आदित्य कोळेकर, निहाल पोफळे, गिरीश नाईक, अभी पाटील, गणेश भाकरे आणि प्रथमेश इंगळे यांनी सहभाग नोंदवून योगदान दिले.