
सिंधुदुर्गनगरी : कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकालचे परिणाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे कृषी विभागामधील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतानाही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही तो द्यावा कृषी सहाय्यकांना ग्राम स्तरावर काम करण्यासाठी कृषी मदतनीस द्यावा आधी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने १५ मे पासून कामकाज बंद करण्यात आले.
आज सोमवारी शासनास जाग आणण्यासाठी या कृषी सहाय्यकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनास कृषी पर्यवेक्षक संघटनेने आपला पाठिंबा देत धरणे आंदोलनात सहभाग घेतला. मात्र, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सहाय्यकांनी आंदोलन सुरू केल्यामुळे जिल्ह्यातील सर्व काम ठप्प झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामांवर परिणाम होणार आहे.