राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर कामाला सुरुवात | कोट्यवधीचा कठडा आला होता धोक्यात

वृक्षारोपणाचा दिला होता इशारा
Edited by: विनायाक गावस
Published on: June 27, 2023 17:03 PM
views 152  views

सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलावाची उपजिल्हा रुग्णालयासमोरील १ कोटी ९३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली रिटर्निंग वॉल ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा धोकादायक बनल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला होता. निष्काळजीपणामुळे पुन्हा हा कठडा कोसळण्याची  शक्यता नाकारता येत नाही असं मत त्यांनी व्यक्त केल होत. यानंतर आज या ठिकाणी भराव टाकच्याचा कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला राष्ट्रवादीन वृक्षारोपणाचा इशारा दिल्यानंतर अखेर जाग आली आहे. या ठिकाणच काम लवकरात लवकर करून हा मार्ग पादचाऱ्यांसाठीच्या मोकळा करावा अशी मागणी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली आहे.