प्रसाद लोकेंच्या खूनानंतर पत्नीने गळफास घेत संपवलं जीवन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 21, 2023 12:02 PM
views 579  views

देवगड : मिठबाव येथील दोन दिवसांपूर्वी खून झालेल्या प्रसाद लोके याची पत्नी मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके, वय 30 यांनी गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मनवा ही मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा मनवा तिच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वाना उठविले. घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेस वर शेडच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत.