राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर तळवणे तरुणांचा मनसेत मोठा पक्षप्रवेश

सुधीर राऊळ यांच्या नेतृत्वावर विश्वास
Edited by:
Published on: December 13, 2022 21:22 PM
views 128  views

सावंतवाडी : राज साहेब ठाकरे यांच्या दौऱ्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या मनात मनसे बद्दल आदर आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे त्यामुळे बऱ्याच लोकांचा मनसे पक्षात जोरदार पक्ष प्रवेश होत आहेत

पक्षप्रवेश या कार्यक्रमावेळी या पक्षात येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना जे संबोधित केले आणि उपस्थित होते ते मनसे पक्षातील सर्वाचे लाडके नेते माजी उपजिल्हाअध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर, सतीश आकेरकर, साहील तळकटकर, महेंद्र कांबळी, सिध्देश सावंत उपस्थित होते.

मनसे पक्षातील प्रवेशा वेळी तळवणे आणि पंचक्रोशीतील गावातील विविध समस्यावर विचार विनिमय करून या समस्यानवर एकमताने आणि एकञ राहुन लवकरात लवकर प्रश्न सोडवू आणि मनसे पक्ष मजबुत आणि राजसाहेबांचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी  सर्वतोपरी काम करू असे आश्वासन सर्व मनसे कार्यकर्यत्याकडून प्रवेशावेळी देण्यात आले त्यांना पक्षवाढीचे काम करतेवेळी काय अडचण येत असेल तर मनसे पक्षाकडून पदाधिकारी वर्गाकडून मदत करण्यात येईल.

मनसे पक्षात प्रवेश करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत आणि आता पुढे पण मनसे पक्षात लोकांचे जोरदार पक्ष प्रवेश होणार आहे आता झालेला तळवणे गावातील पक्ष प्रवेशावेळी उपस्थित अजित पोळजी, नमेश गावडे, ललित परब, अक्षय गावडे, अमरेश गावडे, नितीन गावडे, गजानन परब, समीर पोळजी, मनीष वैज, सुरेश पोळजी, विकास पालव, सचिन पांगम, ओमकार तळवणेकर, हर्षद तळवणेकर, अर्जुन पोळजी, बाबू, गौरेश पालयेकर, सत्यजित गावडे, राजू आरोलकर, संतोष गोडकर, जनार्दन नाईक, सिद्धेश भगे, चिंतामणी(राजा) खोत, विकास साटेलकर, राहुल खरात,शुभम बोंद्रे, गुणाजी मुळीक, शुभम नार्वेकर, अमित पोळजी, भूषण गावडे, राकेश सातार्डेकर, यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.