आंजिवडे नंतर शिवापूर जत्रेत जुगाराचा महापट?

स्थानिक पोलीस मॅनेज ; नूतन पोलिस अधीक्षक लक्ष घालणार का ?
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 26, 2022 23:12 PM
views 681  views

कुडाळ : माणगाव खोऱ्यात रविवारी झालेल्या आंजिवडे जत्रोत्सवात जुगाराचा पट रंगला. आज माणगाव खोऱ्यातील शिवापूर ही शेवटची जत्रा. त्यामुळे या जत्रोत्सवात जुगाराचा महापट बसणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे. स्थानिक पोलीस यंत्रणेला मॅनेज करुन जुगाराचा महापट बसणार आहे. त्यामुळे यात नूतन पोलिस अधीक्षक अग्रवाल लक्ष घालणार का असा सवाल उपस्थित होतोय. आंजिवडे इथ रंगलेल्या जुगार पटाचा फोटो गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झालाय. तो फोटो देखील प्रसिद्ध केला.