
सावंतवाडी : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सिंधुदुर्ग, जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अद्विता दळवी हिने प्रथम क्रमांक मिळवला.
'क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने' हा या स्पर्धेचा विषय होता. अद्विताने आपल्या प्रभावी मांडणीने परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश केला. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.