विशाल परबांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या अॅडव्हान्स शुभेच्छा !

Edited by: विनायक गावस
Published on: October 14, 2023 18:09 PM
views 141  views

सावंतवाडी : भाजप नेते, युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने आज सावंतवाडी येथे करण्यात आला. विशाल पर्वा निमित्त ठिकठिकाणी श्री.परब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून उद्या जिमखाना मैदानावर त्यांचा भव्यदिव्य अभिष्टचिंतन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखाना मैदानावर सुप्रसिद्धगायक जुबीन नौटीयाल यांचा लाईव्ह शो होणार आहे.

या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच आज पदाधिकाऱ्यांनी विशाल परब यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. यावेळी भाजप पदाधिकारी गुरु मठकर यांनी त्यांना लक्ष्मीची मूर्ती भेट म्हणून दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, दिलीप भालेकर, अजय सावंत, परिक्षीत मांजरेकर,  अमित परब, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.