
सिंधुदुर्ग : नुकतीच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलवर ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली असून संस्थेने पत्र पाठवून कळवले आहे. यामुळे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.