
सावंतवाडी : योगाचे आपल्या जीवनात महत्त्व आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर जीवनशैली आहे.योगामुळे शरीर,मन आणि आत्म्यांचा विकास होतो. नियमीत योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक ताण तणाव कमी होतो व आंतरिक शांती मिळते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आरपीडी ज्युनियर स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ.जे.बी.नाईक आर्टस् ॲंड कॉमर्स कॉलेज सावंतवाडी येथे योग शिक्षक पदविका शिक्षणक्रम प्रवेश सुरू करण्यात आला आहे.
योग शिक्षक पदविका शिक्षणक्रमासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी पास आहे. या शिक्षणक्रमासाठी तज्ञ प्राध्यापक संपर्कसत्रात मार्गदर्शन करतील, तसेच बी.ए., बी.कॉम.,एम.ए.(मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थ शास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, लोक प्रशासन), एम.कॉम. व एम.बी.ए. शिक्षणक्रम साठी प्रवेश सुरु आहेत.इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी डॉ. जे. बी. नाईक आर्टस ॲड कॉमर्स कॉलेज सावंतवाडी, आरपीडी प्रयोगशाळा शेजारी, कॉलेज रोड, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, मोबाईल क्रमांक 8605992334 वर संपर्क साधावा.