कोकणामध्ये प्रशासकीय अधिकारी तयार व्हावेत....सत्यवान रेडकर!

बालशिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये शासकीय स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन संपन्न.
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 04, 2023 20:41 PM
views 303  views

कणकवली : तिमिरातूनी तेजाकडे सामाजिक संस्थेतर्फे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील  भूमिपुत्र सत्यवान यशवंत रेडकर यांचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये स्पर्धा परीक्षांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कोकणातील प्रत्येक गावात प्रशासकीय अधिकारी तयार करण्याचा निर्धार करून, 'तिमिरातूनी तेजाकडे'  ही शैक्षणिक चळवळ  सत्यवान रेडकर यांनी  राबविली आहे.   

भूतकाळातील गरिबी आणि त्यांना त्यावेळी न मिळालेले मार्गदर्शन आपल्या कोकणातील मुलांना मिळावे यासाठी त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत. शैक्षणिक चळवळीचा फक्त कोकणात नाही तर महाराष्ट्रभर विस्तार त्यांनी केला. त्यांची १५०हून अधिक व्याख्याने झाली आहेत. उच्चशिक्षित असून ,केंद्र शासनाचे अधिकारी असून  ज्ञानदानासारखे शैक्षणिक पवित्र कार्य ते करत आहेत. "ज्ञानदानाची समाजाला गरज आहे. जिल्ह्यामध्ये परिवर्तन केलेले पाहायचं आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले. शासकीय स्पर्धा परिक्षांसंदर्भात बाल शिवाजीच्या इयत्ता पाचवी ते दहावी तसेच कणकवली तालुक्यातील विविध गावांमधून उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना व्याख्यानाद्वारे अनमोल असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यावेळी अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, संस्थेचे खजिनदार रमेश राणे, संस्थेचे सदस्य संदीप सावंत, शैक्षणिक उत्कृष्टता समन्वयक प्रणाली सावंत,पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.