सावंतवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आदित्य ठाकरेंची भेट !

Edited by: विनायक गावस
Published on: September 22, 2023 17:52 PM
views 288  views

सावंतवाडी : गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेटी देत गणरांयाचे दर्शन घेतले. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी शहरातील सालईवाडा गणेशोत्सव मंडळ, चितारआळी मंडळ, भट्टीवाडी युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा च्या गणराया चरणी लीन झाले. खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानाला भेट देत दर्शन घेतले. 


यावेळी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तसेच भट्टीवाडा युवक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा सावंतवाडी अध्यक्ष स्वप्निल बागकर, उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला सचिव शैलेश वेंगुर्लेकर सहसचिव मंथन जाधव खजिनदार घनश्याम जाबरे सदस्य ओम देऊळकर एडवोकेट आनंद मडगावकर अरविंद परब हिदायत खान आशिष कुलकर्णी महेश बिद्रे गणेश कुडव गणेश वेंगुर्लेकर शंकर तारी रुद्र वेंगुर्लेकर मुन्ना शेख,शैलेश वेंगुर्लेकर, आदी यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा इतिहास  प्रेरणादायी : आदित्य ठाकरे

सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या  गणेश मूर्तीचे  युवासेना प्रमुख आदित्य  ठाकरे यांनी दर्शन घेतले. लोकमान्य  टिळक यांच्या आवाहनापासून प्रेरणा घेऊन या सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात  झाली.  यासंदर्भात  मंडळाचे राजा स्वार यांनी आदित्य ठाकरे यांना माहिती दिली. यावेळी अभय नेवगी, अमरनाथ सावंत, बाळ नार्वेकर राजू  भाट, आबा पडते संकेत नेवगी, ज्ञानु मिशाळ प्रशांत नार्वेकर मंगेश नानचे, वैष्णवी बांदेकर सायली बांदेकर आदी  उपस्थित  होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी सालईवाड्यातील सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळाचा इतिहास  प्रेरणादायी असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.