आदित्य ठाकरे यांनी घेतलं यशवंत परब यांच्या घरी विराजमान बाप्पाचे दर्शन

Edited by: दिपेश परब
Published on: September 21, 2023 15:10 PM
views 256  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने वेंगुर्ल्यात आलेल्या युवासेना प्रमुख तथा उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तुळस येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्या घरी विराजमान बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी यशवंत परब व कुटुंबीयांनी पुष्पगुच्छ व इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती भेट देत त्यांचे स्वागत केले.

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे निष्ठावान पदाधिकारी यशवंत उर्फ बाळू परब यांच्या घरी विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवासेनेचे गीतेश राऊत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, सागर नाणोस्कर, हिमांशू परब, संदेश निकम, अजित राऊळ, प्रकाश गडेकर, संजय गावडे, तुकाराम परब, सुजित चमणकर यांच्यासाहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.