आदित्य ठाकरे उद्या वेंगुर्ल्यात

Edited by: दिपेश परब
Published on: September 20, 2023 16:52 PM
views 285  views

वेंगुर्ला : उबाठा शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी वेंगुर्ल्यात येणार असून  दुपारी १२ वाजता तुळस येथे दाखल होत येथील उबाठा शिवसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब यांच्या घरी विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेणार आहेत.

आदित्य ठाकरे यांचा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात खास गणपती दर्शन दौरा असून ते जिल्ह्यात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या सहित उबाठा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरी विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेणार आहेत.