आदित्य ठाकरे जैतीर चरणी नतमस्तक

Edited by: दिपेश परब
Published on: September 21, 2023 18:44 PM
views 257  views

वेंगुर्ले :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख नेते व पदाधिकारी यांच्या घरी विराजमान गणरायाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर उबाठा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी तुळस येथील जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देव जैतीराचे दर्शन घेतले.

यावेळी खासदार विनायक राऊत, प्रथम मानकरी व देवस्थान कमिटी अध्यक्ष अनिल परब, मानकरी सुभाष परब, यशवंत उर्फ बाळू परब, समीर शेटकर, किरण सावंत यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.