जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य हरमलकर ठरला विजेता..!

कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड
Edited by:
Published on: September 14, 2023 20:01 PM
views 168  views

सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या क्रीडा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सावतवाडी येथील कळसुलकर हायस्कुलाचा सातवीतील विदयार्थी आदित्य सतीश हरमलकर विजेता ठरला आहे त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठो निवड झाली आहे.

आदित्य हरमलकर १४ वर्षा खालील गटातून ५७ किलो वजनी गटात कुस्ती  स्पर्धा खेळला त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धक तनिष अवसरे याच्यावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला अदित्यला कुस्तीपट्टू ललित  हरमलकर यांचे मार्गदर्शन लागले आदित्याच्या कुस्ती मधील यशस्वी कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.