खांबाळेत आदिष्टी मंदिर जिर्णोध्दाराचा वर्धापनदिन 10 मे ला !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 09, 2024 13:35 PM
views 13  views

वैभववाडी : खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदिर जिर्णोध्दाराच्या २१ व्या वर्धापनदिन सोहळ्या निमित्त १० आणि ११ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. उद्या रात्री प्रसिध्द किर्तनकार ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे किर्तन होणार आहे.

खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टी मंदिराचा जिर्णोध्दार वर्धापन दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ वाजता काकड आरतीने या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. पहाटे ५ ते ७ प्रातःस्मरण व काकड आरती, सकाळी १० वाजता-श्री.सत्यनारायणाची महापुजा, दुपारी १ वाजता-महाप्रसाद, सायकांळी ६ ते ७ हरिपाठ,सायकांळी ७ ते ८ वाजता-भजन, रात्रौ ९ वाजता पालखी सोहळा, आणि रात्री १० वाजता हभप ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे किर्तन होणार आहे. ११ मे रोजी दुपारी २.३० वाजता हळदीकुंकु, रात्री ९ वाजता पालखी सोहळा, आणि रात्री दहा वाजता खुली नृत्यस्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्हयातील स्पर्धक सहभागी झाले आहे. या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन श्रीदेवी आदिष्टी देवस्थान स्थानिक सल्लागार व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.