नाताळनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त ८ विशेष गाड्या !

Edited by: ब्युरो
Published on: November 20, 2023 13:07 PM
views 670  views

मडगाव : नाताळ उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त ८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्र. ०१४५३ लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरू जंक्शन ही विशेष (साप्ताहिक) गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून शुक्रवार, २२ व २९ डिसेंबर रोजी २२.१५ वा. सुटेल. दुसऱ्या दिवशी १७.०५ वा. ही गाडी मंगळुरू स्थानकावर पोहोचेल. गाडी क्र. ०१४५४ मंगळुरू जं. - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) गाडी मंगळुरू जंक्शन येथून २३ व ३० डिसेंबर रोजी १८.४५ वा. सुटेल व दुसऱ्या दिवशी १४.२५ वा. लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही २१ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, उडुपी आणि सुरथकल स्टेशन येथे थांबेल.

गाडी क्र. ०१४५५ लोकमान्य टिळक (टी) - करमळी विशेष (साप्ताहिक) गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून २४ व ३१ डिसेंबर रोजी २२.१५ वा. सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.१५ वा. करमळीला पोहोचेल.

गाडी क्र. ०१४५६ करमळी - लोकमान्य टिळक विशेष (साप्ताहिक) गाडी २५ डिसेंबर व १ जानेवारी २०२४ रोजी करमळी येथून ११.४५ वा. सुटेल व त्याच दिवशी २३.४५ वा. लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही २१ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवी स्थानकांवर थांबेल.

गाडी क्र. ०११५५ लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरु जं. विशेष (साप्ताहिक) गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून २६ डिसेंबर व २ जानेवारी रोजी २२.१५ वा. सुटेल व दुसर्‍या दिवशी १७.०५ वा. ही गाडी मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.

गाडी क्र. ०११५६ मंगळुरु जं. - लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) गाडी मंगळुरू जंक्शन येथून २७ डिसेंबर २०२३ व ३ जानेवारी २०२४ रोजी १८.४५ वाजता निघेल व दुसर्‍या दिवशी १४.२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही २२ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव जं., काणकोण, कारवार, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, उडुपी आणि सुरथकल स्टेशन येथे थांबेल.

गाडी क्र. ०१४५९ लोकमान्य टिळक (टी) - करमळी विशेष (साप्ताहिक) गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून २१ व २८ डिसेंबर रोजी २२.१५ वा. सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.१५ वा. करमळीला पोहोचेल. गाडी क्र. ०१४६० करमळी - लोकमान्य टिळक विशेष (साप्ताहिक) गाडी २२ व २९डिसेंबर रोजी करमळी येथून ११.४५ वा. सुटेल व त्याच दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे २३.४५ वा. पोहोचेल. ही २२ डब्यांची गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी स्थानकांवर थांबेल.

गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅपवर पहावे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.