आडवली मालडी सरपंच - उपसरपंच सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

Edited by:
Published on: March 04, 2025 19:51 PM
views 34  views

मालवण : आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यामुळे प्रेरित होऊन मालवण तालुक्यातील आडवली मालडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सर्वत्र सुरु आहे. यां विकासकामांमुळे शिवसेनेत पक्षप्रवेशासाचा धडाका शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून सुरु आहे. काही दिवसांपूर्वी श्रावण गावात मोठा पक्षप्रवेश झाला. त्याच प्रमाणे आडवली गावचा मोठा पक्षप्रवेश शिवसेना आडवली मालडी जिल्हापरिषद मतदारसंघ संपर्क प्रमुख विनायक बाईत यांच्या माध्यमातून झाला. 

मालवण कुंभारमाठ येथील दत्ता सामंत यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आडवली मालडी जिल्हापरिषद मतदारसंघ संपर्क प्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख सुनील घाडीगावकर, श्रावण माजी सरपंच प्रशांत परब, जेरॉन फर्नांडिस, रुपेश पाटकर, दिलीप बिरमोळे, राजू बिडये, मंदार लुडबे, भाऊ मोरजे, युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे, ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, क्रांती धुरी, स्नेहा घाडीगावकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आडवली मालडी प्रवेशकर्ते 

आडवली येथील उबाठा पदाधिकारी अरविंद साटम, विनोद साटम, शाखाप्रमुख विष्णु घाडीगावकर यांच्या पुढाकारातून सरपंच संदीप आडवलकर, उपसरपंच भक्ती साटम, सदस्य सोनाली पराडकर, ज्योती लाड, प्रमोद मसुरकर, विजय कदम, हरिश्चंद्र सावंत, भरतरीनाथ साटम, नितीन पराडकर, रसिका घाडीगावकर, तेजा घाडीगावकर, मिनल साटम, अस्मिता घाडीगावकर, सुशांत साटम, राकेश घाडीगावकर, महेश जाधव, समीर साटम, वैशाली घाडीगावकर, समिधा आडवलकर, समिता आडवलकर, कविता घाडीगावकर, अनिता घाडीगावकर, सुलोचना घाडीगावकर, रामचंद्र यादव, महेश पांचाळ, संभाजी साटम, अमोल घाडी, नितीन घाडीगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, अजित घाडीगावकर, अमोल कदम, योगेश कदम, सागर कदम, नितीन कदम, संदीप सावंत रवींद्र मसुरकर, ओमप्रकाश मसुरकर, प्रथमेश साळकर, गंगाराम राणे, प्रकाश सावंत, मिलिंद मसुरकर, अमृता चव्हाण यांसह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.