
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यातील आंजीवडे गावात २१०० मेगावॅट क्षमतेच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती मेगा प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याची माहिती मिळतेय. १४० हेक्टरवर क्षेत्रात हा प्रकल्प होणार असल्याचं समजत.
अदानी ग्रीन एनर्जी प्रा. लि. कंपनीला मिळालेला हा प्रकल्प 'पंप स्टोअरेज' या प्रकारातील आहे. यासाठी वाशी या गावात उभारलेल्या जाणाऱ्या धरणात सोडण्यात येणार असल्याच कळतय.
कोकणसाद LIVE ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी अद्याप जमिनीचे भू संपादन झालेले नाही तसेच वन जमीनीचं हस्तांतरण झालं नाही अशी ठोस माहिती मिळतेय.
दरम्यान, या सगळ्या प्रकाराबाबत कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून येत आहे. संबधित विभागांकडे याबाबत ठोस अशी माहिती उपलब्ध नाही आहे. एवढी गुप्तता कशासाठीअसा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय.