
दोडामार्ग : आडाळी - फोडिये ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विशाखा विठोबा गांवकर यांची बिनविरोध निवड झाली. परेश सावंत यांनी राजीनामा दिल्याने आडाळी ग्रामपंचायतचे उपसरपंचपद हे रिक्त होते. त्याची निवडणूक प्रक्रिया सरपंच पराग गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विशाखा गांवकर यांचा एकच अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सरपंच पराग गांवकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी माजी उपसरपंच परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य निशा गांवकर, संजना गांवकर, अमोल परब, विठोबा गांवकर, ग्रामसेवक कुणाल मसगे उपस्थित होते.