साळशीतील उबाठा सेनेचे कार्यकर्ते भाजपात...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 11, 2024 08:30 AM
views 236  views

कणकवली : देवगड साळशी येथील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. उभाठा शिवसेनेचे माजी सरपंच किशोर साळसकर, साळशी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सिताराम नाईक यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत असल्याचे माजी सरपंच किशोर साळसकर यांनी सांगितले. यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये, सत्यवान गावकर,अमोल गावकर,धाकू गावकर नंदू गावकर ,शशिकांत साटम, हरी गावकर, अनिल सावंत, केशव लब्द, मंगेश लाड, मधूकर लोड,नितीन लाड,भाऊ पवार, किशोर साळसकर, अमित सोळसकर,हर्षल साळसकर,हमेत गावकर, अजून गावकर,विकास गावकर,मुरारी सावंत

बाळा मिराशे, शशिकांत मिराशी, जगदीश देवणे, महादेव देवणे,पोहूरंग देवणे, हषर्द देवणे,दिनेश सावंत,प्रथमेश नाईक, हर्षद नाईक,अजय नाईक,सिताराम नाईक, प्रमोद परब, राज सावंत,  गोट्या साळसकर,अक्षय गावकर,दिनेश साळसकर यांच्या  सह अनेकांनी प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस,संदीप साटम,युवक अध्यक्ष अमित साटम,वैभव साळसकर,सत्यवान साळसकर,महेश गावकर, दाजी राणे,सुनील गावकर,मंगेश लोके  आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.