
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेने प्रेरित होऊन आज रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील तोंडरे गावातील बाळाराम पाटील, नरेश नरशिंगे, सुधाकर गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी - रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी मंत्री सामंत ह्यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यासमयी तालुकाप्रमुख रूपेश ठोंबरे, विभागप्रमुख प्रकाश म्हात्रे, शाखाप्रमुख समीर म्हात्रे, शाखाप्रमुख राकेश नाईक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.