'त्या' मुर्तीकाराच्या मदतीला धावले दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते !

Edited by: विनायक गावस
Published on: July 24, 2023 15:44 PM
views 1464  views

सिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात नुकसानं होत आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील गणेश मुर्तीशाळेवर वडाचे झाड उन्मळून पडल्यानं तब्बल १०० हून अधिक मुर्त्यांचे नुकसान झाले आहे. परूळे येथील सिद्धिविनायक कला मंदीर या गणेश मुर्तीशाळेवर वडाचे झाड उन्मळून पडल्यानं तब्बल १०० हून अधिक बहुतांश काम पूर्ण झालेल्या मुर्त्यांचं मोठं नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते लागलीच त्या मुर्तीकाराच्या मदतीसाठी पुढे सरसावले. दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या माध्यमातून २५ हजार रूपयांची मदत त्यांना सुपुर्द केली.

तर गणेश चित्रशाळा व मुर्त्यांचं झालेलं नुकसान पाहता शासनाकडून देखील भरीव मदत मिळवून देण्याच आश्वासन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी त्यांना दिलं. याप्रसंगी मुर्तीकार तेली कुटुंबियांकडून दीपक केसरकर मित्रमंडळाचे ऋण व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, तालुका संघटक बाळा दळवी, परेश मुळीक आदी उपस्थित होते.