कांदळगावात कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: September 05, 2023 17:38 PM
views 189  views

मालवण : कांदळगाव धनगरवस्ती येथील अनेक ग्रामस्थांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी यावेळी विभाग प्रमुख राजेश गावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, सरपंच रणजित परब, विकास आचरेकर, बबली कांदळगावकर, नितीन परब, अमोल परब यासह अन्य उपस्थित होते.


यावेळी प्रवेशकर्ते यामध्ये संतोष वरक, दिपक वरक, विठोबा वरक, रूक्मिणी वरक, तानाजी वरक, लक्ष्मी वरक, जनाबाई वरक, लता वरक, सुनिल वरक, विनया बावदाणे, बबन झोरे, शाहु वरक, राजश्री झोरे यांनी प्रवेश केला. अशी माहिती मंदार केणी यांनी दिली.