रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेत्यांवर कुडाळ न.पं.ची धडक कारवाई !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 11, 2024 07:45 AM
views 347  views

कुडाळ : आठवडा बाजाराला रस्त्यावर बसणाऱ्या फळ विक्रेत्यांवर कुडाळ नगरपंचायत ने बुधवारी सायंकाळी धडक कारवाई केली. कुडाळ नगरपंचायतच्या हद्दीतील पोलीस ठाण्यानजीक कुडाळ सावंतवाडी रोडवर भाजी व फळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांना समज देण्यात आली होती.

मात्र बुधवारी सायंकाळी या फळ विक्रेत्यांना समज देऊनही ऐकत नसल्याने व रस्त्यावर ट्राफिक जाम होत असल्याने कुडाळ नगरपंचायत कर व प्रशासकीय अधिकारी राजीव पठाण यांनी नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत कुडाळ सावंतवाडीच्या पोलीस ठाणे नजीकच्या दिशेने बसणाऱ्या फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली.  मात्र यावेळी फळ विक्रेते व नगरपंचायत कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचेही पाहायला मिळाले