
कणकवली : कणकवली नगरपंचायतने शहरांमध्ये अनधिकृतपणे लावलेल्या बॅनरवर कारवाई सुरुवात केली आहे. सकाळपासून ही कारवाई सुरू आहे. दुपारपर्यंत सत्तावीस जणांवर ही कारवाई केली असून पाच हजार पेक्षा जास्त दंड आकारण्यात आला आहे. त्यामध्ये फुटपाथवर लावण्यात आलेले बॅनर हे देखील नगरपंचायतने जप्त केले आहेत तसेच शहरामध्ये होर्डिंग व अनधिकृत लावण्यात येणारे बॅनर हे देखील नगरपंचायतने जप्त केले आहेत.
यावेळी कणकवली नगरपंचायत वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, कर्मचारी प्रवीण गायकवाड, प्रशांत राणे, नाटळकर तुषार मोरे, विशाल होडावडेकर व कर्मचारी उपस्थित होते.