सावंतवाडीत 5 धूम स्टाईल बाईकस्वारांवर कारवाई !

Edited by: विनायक गावस
Published on: November 15, 2023 15:34 PM
views 131  views

सावंतवाडी : शहरात मोती तलाव येथे दिवाळीनिमित्त पाच धूम स्टाईल बाईक स्वारांवर काल रात्री कारवाई करण्यात आली आहे. त्या गाड्या जप्त करून येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यात आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे.


 दिवाळीनिमित्त मोती तलाव परिसरात मोठ्या संख्येने धूम स्टाईल बाईक स्वार हे गाडी चालवत असतात त्यामुळे पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी जीवनरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन काल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस सुनील नाईक, पोलीस साटेलकर,मयूर सावंत यांनी केली.