
सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या इनोव्हा गाडीवर राज्य उत्पादन शुल्क च्या विभागाने बांदा येथे कारवाई केली. या कारवाईत ६लाख ३० हजार रुपयाची दारू व १० लाख किमतीची गाडी असा एकूण १६लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी रविराज अंबाजी सावंत( वय ३१ वर्षे. रा. तांबोळी, खालचीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने केली.”