दारू वाहतुकीवर कारवाई

१९ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Edited by: संदीप देसाई
Published on: May 29, 2024 14:10 PM
views 447  views

बांदा : मुंबई - गोवा महामार्गावर इन्सुली पोलीस चेकपोस्टवर बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात ७ लाख २० हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी इक्बाल जुमाभाई थेबा (२६, रा. जुनागड सिटी, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली. 

या कारवाईत १२ लाखांचा ट्रक (जीजे ०१ डीवाय ५५९४) ताब्यात घेण्यात आला. तसेच ७ लाख २० हजार रुपयांची मोबी व्होडका ऑरेंज असे लेबल असलेल्या दारूचे २०० बॉक्स जप्त करण्यात आले. तसेच ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १९ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार व रोहित कांबळे यांनी केली.