बांद्यात बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

Edited by: विनायाक गावस
Published on: June 28, 2023 20:11 PM
views 177  views

बांदा : निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , तपासणी नाका इन्सुली , ता . सावंतवाडी , जि . सिंधुदुर्ग या पथकाने पत्रादेवी - बांदा रोडवर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना पिकअप वाहनासह 14,10,000 / - रु . किंमतीचा मुद्देमाल जप्त केला . दि .28 / 06 / 2023 रोजी मा . श्री . विजय सुर्यवंशी , आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य , सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व. द . ) राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य मुंबई , विजय चिंचाळकर , विभागीय उपआयुक्त , राज्य उत्पादन शुल्क , कोल्हापूर विभाग कोल्हापूर , वैभव वैद्य, प्र . अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पत्रादेवी बांदा रोड , पिंपळेश्वर गणेश मंदिराजवळ , बांदा , ता.सावंतवाडी , जि . सिंधुदुर्ग येथे महिद्रा कंपनीचे सफेद रंगाचे बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्र . MH - 07 - P - 0841 सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की 180 मि.ली क्षमतेच्या एकुण 9600 बाटल्यांचे 200 बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला . आरोपी  विठ्ठल बाळकृष्ण परब , सावंतवाडी , जि . सिंधुदूर्ग यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले .

सदर गुन्ह्यामध्ये अं . रु .9,60,000 / - किंमतीचे मद्य व रु .4,50,000 / - किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण रु .14,10,000 / - किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला . ही कारवाई  वैभव वैद्य , प्र.अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली  संजय मोहिते , निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क , तपासणी नाका इन्सुली ,  तानाजी पाटील, प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक निरीक्षक , गोपाळ राणे , सहाय्यक दुय्यम निरीक्षक  दिपक वायदंडे , जवान प्रसाद माळी, वाहनचालक रणजीत शिंदे  यांनी केली . या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली  प्रदीप रास्कर हे करीत आहेत.