वेंगुर्ल्यात गोवा बनावटी दारूवर कारवाई

गोवा येथील तरुणाकडून दारू सहित सुमारे १ लाखांचा मुद्देमाल जप्त
Edited by: दिपेश परब
Published on: September 01, 2023 10:43 AM
views 273  views

वेंगुर्ला : दुचाकीने वेंगुर्ला येथे गोवा बनावटी दारूची वाहतूक करत असताना पेडणे गोवा येथील ऑलविन अंतोन फर्नांडिस (३९) या आरोपीला वेंगुर्ला पोलिसांनी वेंगुर्ला एसटी स्टँड येथून ताब्यात घेत कारवाई केली. 

ही कारवाई आज सकाळी ६.३० वाजता करण्यात आली. यात आरोपीच्या ताब्यातून गोवा बनावटीच्या दारू सहित जांभळ्या रंगाची जुपिटर जिए ११ एफ ९५४९ मिळून एकूण १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक अतुल जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर, पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर यांनी कारवाई केली असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.