रत्नागिरी : हिंदू-मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यां बद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले जाती-जातीत,धर्मा-धर्मात वाद निर्माण करणे अयोग्य असून देशद्रोही,देश विरोधात काम करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लाऊन त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातात,तेव्हां धर्माच्या विरोधात घडवून आणलेल्या घटनांना विरोध करण्यासाठी सदनशील मार्गाने आंदोलनं करुन, सनातन धर्माची ताकद दाखवावी लागते.
रत्नागिरीत हिंदू समाजाचा मुस्लिम समाज काही दुश्मन नाही.दोनही धर्मात सलोख्याचे समंध आहेत.या चांगल्या गोष्टींचा फायदा घेऊन, काही देशद्रोही वृत्तीची व्यक्ती अशी कृत्य करतात. अशा समाज विरोधक कृतीला शांत आणि संयमी असणाऱ्या समाजाला बळी पडावं लागतं. रत्नागिरीतील कर्ला -जुवा ची ऐतिहासिक गणपती मिरवणुकीत शेकडो गणपती असतात. मुस्लिम बांधव या मिरवणुकीचे स्वागत दरवर्षी करतात, सहभागी होतात. तसेच हिंदु समाजाचे इतरही सण, उत्सव, यात्रा, देवतांचे कार्यक्रम, मिरवणूकांमध्ये , जिल्ह्य़ातील मुस्लिम बांधव त्यांचे स्वागत करुन , त्यात सहभागी होतात. तर मुस्लिम समाजाच्या, मोहरम, रमजान ईद,दर्गा ऊरूस आगीमध्ये हिंदु समाज सहभागी होतो. असे हे सगळे हिंदू- मुस्लीम संबंध रत्नागिरी जिल्ह्यात एकोप्याने नांदत आहेत. हा एक आगळा वेगळा आदर्श रत्नागिरीचा आहे. त्यामुळे धर्मा-धर्मात वाद लावून ,मातृभूमीच्या विरोधात अशी गैरकृत्य करणारी माणसं ही देशाचे शत्रूच असतात. त्यामुळे अशी देश विघातक कृत्य करणार्यांना माफी नाही, हीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा होती, पहिल्या पासून हीच भूमिका आमची ही आहे. याचे उदाहरण देताना महाराष्ट्र शासनातील मंत्री अब्दुल सत्तार यांंचे उदाहरण देऊन, तेही याच विचारधारेनुसार सरकार मध्ये उत्तम काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण करून देश विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली.