
दोडामार्ग : गोवा बनावटीच्या अवैध दार विरोधात दोडामार्ग पोलिसांनी सुरू केलेली धडक कारवाई अधिक गतिमान केली आहे. शुक्रवारी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व टीमने वझरे गावठाण वाडी येथे गोवा बनावटीची अवैध दारू बाळगल्याप्रकरणी दिपाली देवानंद शिरसाठ (५६, रा.वझरे गावठाण वाडी) व प्रताप महादेव कळंगुटकर (६२, रा. बाये, सुर्ला, उ. गोवा) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ),(ई), ८१, ८३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४९ हजार ९२० रुपयांच्या मद्यासह वाहन मिळून तीन लाख ४९ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घरात प्रत्येकी १८० रुपये किंमतीची मॅकडोवेल्स नंबर १ रिझर्व व्हिस्की लेबलच्या १८० मिली मापाच्या १९८ बाटल्या, ९० रुपये किंमतीची ओल्ड मंक ट्रिपल एक्स रम लेबलच्या १८० मिली मापाच्या ४८० बाटल्या, २०० रुपये किंमतीची किंगफिशर प्रीमियम बियर लेबलच्या ६५० मिली मापाच्या ३४५ बाटल्या, १०० रुपये किंमतीची किंगफिशर प्रीमियम बियर लेबलच्या ३०० मिलीमापाच्या ९६ बाटल्या, १६० रुपये किंमतीची मेंशन हाऊस फ्रेंच ब्रँडी लेबलच्या १८० मिली मापाच्या ४४ बाटल्या, १२० रुपये किमतीच्या ओल्ड मंक ट्रिपल एक्स रम लेबलच्या १८० मिली मापाच्या २२ बाटल्या, १४० रुपये किंमतीची किंगफिशर प्रीमियम बियर लेबलच्या ५०० मिलि मापाचे ८६ डबे, १६० रुपये किमतीची किंगफिशर स्ट्रॉंग बियर लेबलच्या ५०० मिली मापाचे २२ डबे असा मिळून १ लाख ४९ हजार ९२० रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू तसेच २ लाख रुपये किमतीचे वाहन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
कारवाईचे स्वागत .. मात्र यात सातत्य राखण्याची अपेक्षा..
दोडामार्ग तालुक्यात अवैध दारू विक्री मोडीत काढण्यासाठी प्रसार माध्यमाने आवाज उठविल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निसर्ग व तारीख सहाय्यक फौजदार गवस श्री माळगावकर समीर सुतार श्रीमती नाईक होमगार्ड झोरे यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे मात्र ही कारवाई इथेच न थांबता दोडामार्ग तालुक्यात अन्य बराच ठिकाणीही बेकायदा सुरू असलेल्या दारू विक्रीची केंद्र मुळासकट उखडून काढण्याची अपेक्षाही तालुका वासियायातून व्यक्त केली जात आहे.