
कणकवली : ऑनलाईन जुगाराविरोधात कणकवली पोलिसांनी दमदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कणकवलीत ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या ५- ६ एजंटांना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईची माहिती समजतात काही जणांनी आपल्या मोबाईलमधून ऑनलाइन जुगारचे ॲप डिलीट केले आहेत.तर काहीजण संशयित आरोपी असलेले पसार झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ऑनलाईन जुगार स्वतः खेळत असेल आणि त्या ऑनलाईन जुगारांवर दुसऱ्याचे पैसे लावून खेळ खेळवला गेला तर तो गुन्हा आहे. सर्व ताब्यात घेतलेल्या लोकांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करत त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशिरापर्यंत होईल असे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले. ही कारवाई निरीक्षक अमित यादव,पोलीस रुपेश गुरव,पोलीस हवालदार श्री.सुपल, श्री.नाईक , पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, राज आघाव यांच्या पथकाने केली. जुगार खेळण्यासाठी वापरत असलेले मोबाईल ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणले.