
कणकवली : तालुक्याची गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली तहसील कार्यालय येथे गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये 16 सप्टेंबर पासून कणकवली शहरात अनधिकृत पार्किंग करण्यात येणाऱ्या गाड्यावर कारवाई करण्याच्या सूचना आरटीओ, महामार्ग प्राधिकरण व पोलीस प्रशासन यांना करण्यात आल्या.
तसेच कणकवली ब्रिज खाली स्थानिक फळ विक्रेते फुल विक्रेते व भाजी विक्रेते यांच्यावर 29 सप्टेंबर नंतर कारवाई करण्यात येणार असल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लक्झरी बसेस साठी मराठा मंडळ व नरडवे रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी भालचंद्र महाराज यांच्या समोरील बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलन च्या आवारामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे कणकवली मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले. तसेच तालुक्यामध्ये फोंडाघाट, कनेडी नांदगाव, यासारख्या मोठ्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले. व सार्वजनिक बांधकाम विभागाणे महामार्गावरील खड्डे व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजऊन रस्ते सुस्थितीत करण्याचे सूचना देखील या बैठकीत करण्यात आल्या व चतुर्थीच्या कालावधीत मोबाईल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांना आपली सेवा सुरळीत ठेवण्यास सांगण्यात आले यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ, पोलीस निरीक्षक अमित यादव,मोटार वाहन पोलिस निरीक्षक विजय अलमवार, महामार्ग प्राधिकरणचे उप अभियंता एम आर साळुंखे ,व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता के.के. प्रभू, बीएसएनएलचे विजय नेरकर, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, ज्येष्ठ नागरिक दादा कुडतरकर, महावितरणाचे प्रकल्प येळगुकर, विनोद सावंत, सतीश कांबळे ,सुरेंद्र शिंदे, महेंद्र कदम, चिन्मय मुसळे, व इतर अधिकारी उपस्थित होते