राजकीय पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी धुडकावत 11 जुगाऱ्यांवर कारवाई !

दिवसाढवळ्या कोळपे जमातवाडी इथं सुरु होता जुगार अड्डा | वैभववाडी पोलिसांनी टाकली धाड !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 31, 2022 08:31 AM
views 593  views

वैभववाडी: कोळपे येथे दिवसाढवळ्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर वैभववाडी पोलीसांनी छापा टाकला. पोलीसांनी जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले असुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कोळपे परिसरात खळबळ माजली आहे. मधस्थी करण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात गर्दी केली होती.

 कोळपे जमातवाडी येथे जुगार खेळत असल्याची माहीती पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस शिपाई कृष्णांत पडवळ, अजय बिलपे, कुंडलिंक वानोळे, अमोल जाधव जुगारअड्ड्यावर छापा मारण्यासाठी कोळपे जमातवाडी येथे पोहोचले. जमातवाडी येथील एका सागाच्या झाडाखाली व्हाळाच्या शेजारी काही लोक जुगार खेळत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ या अड्डयावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्या अकरा जणांना ताब्यात घेतले. सर्वावर  गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा झालेल्यांमध्ये कादिर इब्राहीम थोडगे, वय-५०, हुसेन उमर लांजेकर, वय-४१, नासीर कमरूद्दीन नंदकर वय-५३, युसुफ फकीर नंदकर वय-४५, खुदबुद्दीन महमंद नंदकर वय-३६, अल्ताफ शब्बीर नंदकर वय-२४,हुसेन धोंडु नंदकर वय-४६, रमजान सरदार नाचरेकर वय-३०, दाऊद हसन नाचरेकर वय-५०, सर्व रा.कोळपे जमातवाडी, खुदबुद्दीन इब्राहीम पाटणकर रा.उंबर्डे मेहबुबनगर यांचा समावेश आहे.

जुगार खेळण्यासाठी असलेले साहीत्य आणि २ हजार ९०० रूपये देखील पोलीसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईनंतर तालुक्यात खळबळ उडाली. संशयितांना सोडविण्यात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात गर्दी केली होती. मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र पोलीसांनी त्या अकराही जणांवर कारवाई केली. तालुक्यात पोलिसांनी अवैध धंद्याबाबत अशीच कडक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.