ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंचांची निर्दोष मुक्तता

आरोपीतर्फे ॲड. विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 05, 2022 15:53 PM
views 126  views

कुडाळ : ग्रामपंचायत पडवे व ग्रामपंचायत रानबांबुळी येथील तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारांचा गैरवापर करून अपहार केल्याचा आरोप होता. ग्रामपंचायतीकडे प्राप्त होणारा महसूल कर रक्कम, शासकीय अनुदान या रकमेचा विविध कामांसाठी दप्तरी खोट्या नोंदी करून खर्ची दाखवून चेक द्वारे व परस्पर रकमा काढून बनावट नोंदी करून कागदपत्रांच्या आधारे ग्रामपंचायतीला नुकसान होईल व स्वतःचा फायदा होईल या उद्देशाने सन २००७-०८ मध्ये रक्कम रुपये २,७६,७५४ आणि सन २००८-०९ मध्ये रक्कम रुपये १,९५,७७६ अपहार केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सदर कामी सरकारपक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारातील तफावती, आरोपी तर्फे वकील ॲड. विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मुख्य न्यायदंडाधिकारी फडतरे यांनी प्रिया दिपक बोभाटे रा. पडवे, चंद्रकांत ठाकूर रा. रानबांबुळी, धायाजी केशव परब रा. पडवे, जयश्री साबाजी परब रा. रानबांबुळी यांची निर्दोष मुक्तता केली.  सदर केसचे कामी ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांचे सहकार्य लाभले.