महिलेचा विनयभंग प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

Edited by: विनायक गावस
Published on: July 07, 2023 14:51 PM
views 309  views

सावंतवाडी : महिलेचा विनभंग करण्याच्या हेतूने तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्या प्रकरणी शिवाजी गोविंद गवस व एकनाथ शिवाजी गवस दोन्ही रा. झोळंबे ता.दोडामार्ग या दोन्ही आरोपींची दोडामार्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. 

         याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी याने दि. १९/०५/२०२० रोजी दोडामार्ग येथे महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केलेले होते, त्या प्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारी वरून संबंधीत आरोपी यांना दोडामार्ग पोलिसांनी दि २०/०५/२०२० रोजी अटक केलेली होती. याप्रकरणी दोडामार्ग येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या समोर खटला चालविण्यात आला. याकामी सरकार पक्षाच्यावतीने एकूण सात  साक्षीदार तपासण्यात आले. तपासादरम्यान साक्षीदारांच्या जबाबात असलेला दोष,साक्षीदारांचा उलट तपास,पोलीस तपासादरम्यान असलेला दोष, अशा प्रकारचे दोष सरकारपक्ष पुराव्यांसहित साबीत न करू शकल्याने,त्याचा फायदा देवून सबळ पुराव्याअभावी आरोपी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.