नेरूर येथील जुगार प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

Edited by: दिपेश परब
Published on: March 08, 2023 14:25 PM
views 296  views

कुडाळ: 

 नेरूर- घाडीवाडी येथे जुगार खेळत असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ११ आरोपींची कुडाळ न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. 

  ३ जून २०२० रोजी नेरूर घाडीवाडी येथे जुगार खेळत असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा कलम १२ (अ),  तसेच भा. द. वि कलम १८८, २६९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी दशरथ घाडी, सचिन बंगे, महेश घाडी, रोशन परुळेकर, सचिन तेली, बबन साळगावकर, सागर चव्हाण, शिवराम मडवळ, हेमंत कद्रेकर, उमेश कानडे, नारायण खवणेकर या सर्व आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सर्व आरोपींच्या वतीने ॲड. रीना बंगे- पडते, ॲड. श्रीपाद विलास महाजन, संपदा तुळसकर, अभिषेक निकम यांनी काम पाहिले.