आचिर्णे तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी महेंद्र रावराणे..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 30, 2023 19:46 PM
views 249  views

वैभववाडी : आचिर्णे गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी महेंद्र रावराणे यांची  बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. आचिर्णे गावची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या सभेत रावराणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. रावराणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या निवडीनंतर सरपंच रुपेश रावराणे यांनी अभिनंदन केले. यावेळी गिरीधर रावराणे, जयसिंग रावराणे, समिर रावराणे, आदेश रावराणे, उत्तम सुतार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.