
वैभववाडी: आचिर्णे आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स ज्युनियर कॉलेजचा इयत्ता १२ वी (HSC) २०२५-२६ चा निकाल जाहीर झाला असून विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेचा एकूण निकाल ९८.१४%लागला आहे. या शाखेत एकूण ९५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९४विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिला. या शाखेतून श्रेया संदीप शेळके (८३%)प्रथम, सखाराम मोतीराम गुराखे (७५.८३%) द्वितीय, श्रुष्टी संतोष कदम (६९%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
वाणिज्य शाखेचा निकाल ९३.५५% लागला आहे. या शाखेत ३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या शाखेत समिक्षा रामदास शेलार (७६.५०%) प्रथम, रोशनी रविंद्र शिंदे(७२.१७%) द्वितीय, सिद्धी सूर्यकांत मांडवकर – (६६.१७%)गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










