
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे फेब्राुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला वेंगुर्ला तालुक्यातून 642 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 624 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 97.19 टक्के लागला. तर शिरोडा येथील बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयातील एम.सी.व्ही.सी.शाखेची विद्यार्थीनी गायत्री वारगांवकर हिने 90 टक्के गुण मिळवित वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातील कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक ज्युनिअर कॉलेज आणि रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के, बा.म.गोगटे ज्युनिअर कॉलेज, शिरोडा - 97.73 टक्के, बॅ.खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला - 96.71 टक्के, शासकीय आयटीआय, वेंगुर्ला - 44.44 टक्के लागला.
वेंगुर्ला तालुक्यातील पहिल्या पाच क्रमांकामध्ये शिरोडा येथील बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयातील एम.सी.व्ही.सी.शाखेची विद्यार्थीनी गायत्री वारगांवकर (90 टक्के) प्रथम, बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा पुष्कर पेडणेकर (87.33 टक्के) द्वितीय, विज्ञान शाखेची स्नेहा नार्वेकर (85.33 टक्के) तृतीय, वाणिज्य शाखेची मृण्मयी परब (85 टक्के) चतुर्थ तर बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेची सलोनी बागवे (83.67 टक्के) पाचवा आदींचा समावेश आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज निहाय निकाल खालीलप्रमाणे
रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजमधून बसलेले 41 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. या कॉलेजमधील वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. या शाखेतून 26 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-करण करंगुटकर (75.67 टक्के), द्वितीय-नेहा कामत (67.17टक्के), तृतीय-मानसी सावंत (65.83 टक्के). कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला. या शाखेतून 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-उमेश साळकर (53.50 टक्के), द्वितीय-सुमित नेमळेकर व ओम नाईक (52.33 टक्के), किमान कौशल्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. या शाखेतून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-शंकर मुणनकर, द्वितीय-वैभव राऊळ, तृतीय-सखाराम वरक.
कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयातून बसलेले एकूण 106ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला. यात बसलेले 17 ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-यश राऊळ (65.67 टक्के), द्वितीय-अन्नपूर्णा गावडे (58.17 टक्के), तृतीय-वैभवी गावडे (53.83 टक्के), वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला. यातील 29ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-मनिष आमडोसकर (79.50 टक्के), द्वितीय-जतिन गुरव (76.33 टक्के), तृतीय-मनाली नाईक (74.50 टक्के), स्वयं अर्थसहाय्यीत विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला. यातील 60ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-किर्ती कुंभार (81 टक्के), कानू धुरी (79.83 टक्के), स्वरूपा आईर (75.50 टक्के).
बा.म.गोगटे कनिष्ठ महाविद्यालयातून 237 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 234 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 97.73 टक्के लागला. महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल 90.62 टक्के लागला. या शाखेतून बसलेले 32 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-दिक्षा बागकर (71 टक्के), द्वितीय-मैथिली वराडकर (70.67 टक्के), तृतीय-कस्तूरी वस्त (69टक्के), वाणिज्य विभागाचा निकाल 100 टक्के लागला. यात बसलेले 64ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-ईशांत सावंत (83 टक्के), द्वितीय-रविना कापडी (79.67 टक्के), तृतीय-प्रिया वारखंडकर (78.67 टक्के), विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला. यात बसलेले 101 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-सलोनी बागवे (83.67 टक्के), द्वितीय-अथर्व सोन्सुरकर (83.33 टक्के), तृतीय-नरेश कांबळी (79.33 टक्के), एम.सी.व्ही.सी.चा निकाल 100 टक्के लागला. यात बसलेले 40ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-गायत्री वारगांवकर (90 टक्के), द्वितीय-रिद्धिमा गोडकर (82 टक्के), तृतीय-गुरूनाथ तारी (79.83 टक्के).
बॅ.खर्डेकर महाविद्यालयातून एकूण 257 विद्यार्थी बसले होेते. त्यापैकी 247 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 96.11 टक्के लागला. महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 99.22 टक्के लागला. यात 137 पैकी 136 उत्तीर्ण झाले. प्रथम-स्नेहा नार्वेकर (85.33 टक्के), द्वितीय-गौरवी मांजरेकर (77.67 टक्के), तृतीय-यशस्वी परब (77.50 टक्के), वाणिज्य शाखेचा निकाल 91.48 टक्के लागला. यात 47 पैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-पुष्कर पेडणेकर (87.33 टक्के), द्वितीय-मृण्मयी परब (85 टक्के), तृतीय-समिक्षा बोवलेकर (77.17 टक्के), कला शाखेचा निकाल 90.19 टक्के लागला. यात 51 पैकी 46 उत्तीर्ण झाले. प्रथम-केतकी वेंगुर्लेकर (79.50 टक्के), द्वितीय-तन्मयी सातोस्कर (78.17 टक्के), तृतीय-ज्योती हरमलकर (68.50 टक्के), व्होकेशनल शाखेचा निकाल 100 टक्के लागला. यातील 22ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम-हरेश तेंडोलकर (64.50 टक्के), द्वितीय-पूर्वा अरावंदेकर (63.17), तृतीय-तुकाराम कोळी (62.50 टक्के).










