आचार्य पं. मुकुल शिवपुत्रांच्या संगीत मैफिलित सावंतवाडीकर मंत्रमुग्ध

Edited by: विनायक गावस
Published on: November 25, 2023 19:43 PM
views 214  views

सावंतवाडी : पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाखीय संगीत मैफिल आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांचा गंधर्वगान सावंतवाडी राजवाडा येथे होत आहे. महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी शुभेच्छा देताना सांगितले. यावेळी केसरकर यांच्या हस्ते पंडित मुकुल शिवपुत्र यांचा तर साथीदारांचा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते पंडित कुमार गंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. 

त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आचार्य पंडीत मुकूल शिवपुत्र गंधर्वगान आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, श्रीमंत शुभदादेवी भोसले, अभिनेता सयाजी शिंदे, केसरकर मित्रमंडळाचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रिया आचरेकर व संगीत साथीदार उपस्थित होते. 

पंडित कुमार गंधर्व यांच्या प्रतिमेला पुष्पहार श्रीमंत शुभदादेवी भोसले व मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते घालून पुजन केले. त्यानंतर प्रिया आचरेकर यांचा सत्कार श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.तर अभिनेता सयाजी शिंदे यांनी सर्व साथीदार कलाकारांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंडित मुकुल शिवपुत्र यांचा सन्मान मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला तर स्वागत राजन पोकळे यांनी केले.पं. कुमार गंधर्व यांचे सुपुत्र आणि प्रथम शिष्य असलेले पं. मुकुल शिवपुत्र हे हिंदुस्थानी अभिजात शास्त्रीय संगीताच्या दुनियेत प्रथमस्थानी विराजमान आहेत. 

यावेळी श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनी शुभेच्छा दिल्या तर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर म्हणाले, पंडित कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मैफिलीचा अपुर्व योग आला आहे.  आपण ही मैफिल घेऊन जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यात उपक्रम घेत आहात त्याबद्दल शुभेच्छा.