आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत मंगेश टेमकर यांना चांगला प्रतिसाद

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 01, 2023 19:50 PM
views 65  views

मालवण : आचरा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगेश टेमकर यांना सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे हक्काचे व विश्वासाचे नेतृत्व म्हणून मंगेश टेमकर यांना पाठींबा मिळत आहे. घरोघर प्रचार यत्राणा राबवताना सरपंच उमेदवार मंगेश टेमकर व सर्व सदस्य उमेदवार यांना जनतेतून पाठिंबा मिळत आहे. श्री देव रामेश्वराचे आशीर्वाद व जनतेच्या पाठिंब्यावर विजय निश्चित होईल . असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान गावातील महिला आणि अन्य नागरिकांचा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास आचरा गावच्या माजी सरपंच आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांच्या कन्या प्रणया टेमकर यांनीही व्यक्त केला आहे.

मागील ग्रा. पं. निवडणुकीवेळी मी नवखी असताना मला येथील ग्रामस्थानी वडिलांच्या विश्वासामुळे सरपंच पदी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. सरपंच पदाच्या कालावधीत आमदार वैभव नाईक यांनी आम्ही अन्य पक्षात कार्यरत असतानाही गाव विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून

मंगेश टेमकर (वडील) यांची गाव विकासाची तळमळ आणि आ. वैभव नाईक यांची समर्थ साथ त्यामुळे मंगेश टेमकर यांच्यासह आचरा ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय जनतेच्या सोबतीने निश्चित होईल असे त्या म्हणाल्या.

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सौ. प्रणया टेमकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना व महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी माजी पं. स. सदस्य निधी मुणगेकर, अनुष्का गावकर, प्रिया मेस्त्री, सुकन्या वाडेकर, पूर्वा तारी, सोनिया तोंडवळकर, लक्ष्मी कुबल, तारामती कोचरेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

माजी सरपंच प्रणया टेमकर म्हणाल्या, माझ्या सरपंच निवडणुकीवेळी प्रामाणिपणे सांगायचे तर मला जास्त कोणी ओळखत नव्हतं. पण माझ्या बाबांच्या कार्यक्षमतेवर विश्वास असलेल्या जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष मी आचरा ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यभार सांभाळाला. या कालावधीत प्रशासकीय स्तरावर गाव विकासाच्या अनेक गोष्टी शिकता आल्या. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बरेच रस्ते, पायवाटा , पाणी प्रश्न, अंगणवाडी, महिला सक्षमिकरण अशी बरीच कामे पार पडली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात मी गावात बरीच कामे करू शकली. वडिलांप्रमाणेच अन्य ग्रामपंचायत सदस्यांचा सपोर्ट मिळाला. त्यामुळे या पाच वर्षात बरीच कामे मार्गी लागली. ग्रामस्थांचे विशेषतः महिलांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. त्यामुळे आता प्रचार करताना महिलांचा, ग्रामस्थांचा विश्वास आमच्यावर आहे हे दिसून येत आहे. जनतेचा विश्वास आम्ही कायम ठेवू त्यांना अपेक्षित असलेला गाव विकास यालाच आमचे प्राधान्य राहील. 

आचरा गावांत पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावात होता. म्हणून पूर्ण गावाची नळ पाणी योजना आमच्या कार्यकाळात सर्वांच्या सहकार्याने मंजूर झाली याचा निश्चित आनंद आहे. गावासाठी चार कोटीची योजना मंजूर झाली आहे. हे काम आता प्रगतीपथावर आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याचे काम माझे वडील व निवडून आलेले आमचे सदस्य करतील.

या निवडणुकीत आम्ही घरोघरी प्रचारावर भर देत आहोत. लोकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवातांचा तसेच सरपंच उमेदवार वडील मंगेश टेमकर यांचा विजय निश्चित होईल. असा मला विश्वास आहे. बचत गटाच्या माध्यमातून आचरा गावात मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण करण्यात आले. या पाच वर्षात या महिलांना प्रशिक्षण देऊन त्या स्वतःसाठी स्वतः रोजगार निर्मिती करीत आहेत. येथील महिलांमध्ये मोठी क्षमता आहे. प्रामाणिकपणा आहेत. या महिला वर्गासाठी अधिकाधिक विकासकार्य करण्याचे आमचे सर्वांचे निश्चितच प्रयत्न राहतील. गावाचा अधिकाधिक सर्वांगीण विकास यासाठीच आम्ही सर्व यापुढेही प्रयत्नशील राहू. आचरा वासिय जनतेला ज्या पद्धतीने विकास अपेक्षित आहे त्याच पद्धतीने काम करण्याचे वडील मंगेश टेमकर व सर्व सदस्य या सर्वांचे धोरण आहे. असेही प्रणया टेमकर म्हणाल्या.