दुचाकी चोरीची आरोपीची कबुली

Edited by:
Published on: June 13, 2023 20:08 PM
views 165  views

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम  379 हा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल आहे. ह्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बतमीदारामार्फत समांतर तपास करत असताना संशयीत गौरेश बाळकृष्ण परब वय 27 वर्ष राहणार सोनुर्ली पक्याचीवाडी सध्या राहणार मळगाव यास तपास कामी ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपी याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात चोरी केलेली दुचाकी  व दुचाकीच्या तोडलेल्या नंबर प्लेट जप्त केल्यात. फिर्यादी हीतेन नाईक यांनी ही स्वतः मेहनत घेऊन तपासात मदत केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल

अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुरुनाथ कोयांडे 

पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर यांनी केली आहे.